Ad will apear here
Next
सामाजिक उपक्रमांसाठी मुकुल माधव फाउंडेशनचे अन्य कंपन्यांना आवाहन
पुणे :  खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनमार्फत (केएसडब्ल्यूए) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत (आयआरडीपी) पालघर विभागातील गावांमध्ये प्रत्येक घरात शौचालय बांधून देऊन हा परिसर हागणदारीमुक्त केला जात आहे. कुटुंबांना चांगल्या वैयक्तिक आणि समुदायाच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या पद्धतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याच्या प्रवृत्तीला पायबंद आणि स्वच्छतेला चालना देण्याचा भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि त्यांचे सामाजिक दायित्व उपक्रम (सीएसआर) भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांनी पालघर जिल्ह्यातील सोनाले या आदिवासी क्षेत्रात ५० घरांमध्ये शौचालये सौर ऊर्जेवर आधारीत दिव्यांसह बांधून दिली आहेत. ही शौचालये व्यक्तिगत वापरासाठी आणि लाभार्थी व्यक्तीच्या नामफलकासह तयार करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात, आणखी ५० शौचालयांच्या बांधणीसाठी मुकुल माधव फाउंडेशनला झेडएफ स्टीअरिंग गीअर कंपनी, तसेच  हिंदुजा समूह सहकार्य करणार असून, तिसऱ्या टप्प्यात २३ शौचालये आणि या परिसरातील जलसाठ्याच्या संवर्धनाच्या प्रकल्पालाही मदत केली जाणार आहे. 

रितु छाब्रिया
या उपक्रमाबाबत मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया म्हणाल्या, ‘स्वच्छता आणि सफाईच्या योग्य सुविधा, रोग पसरविण्यास प्रतिबंध करण्यासह निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाजाची खात्री देतात. आम्ही नेहमी स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिलो आहोत. केएसडब्ल्यूएच्या सहकार्याने उघड्यावर शौचाच्या सवयीचे धोके समजावून देताना आम्ही अधिक सक्रिय भूमिका बजावू इच्छितो.’ 

त्या पुढे म्हणाल्या, ‘समविचारी कॉर्पोरेट कंपन्यांना या प्रकल्पासाठी एकत्र आणून फिनोलेक्स आणि एमएमएफने प्रकल्पाची व्याप्ती वाढविली आहे. यामुळे मोठ्या लाभार्थींच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील.’
 
‘या उत्कृष्ट उपक्रमाचा आम्हीही एक भाग बनलो हे खूप आनंददायी आहे’, असे झेडएफ स्टीअरिंग गीअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष मुनोत यांनी नमूद केले.

त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना समाजाचे ऋण फेडण्याचे प्रोत्साहन आणि शिक्षणही दिले जात आहे. लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये संकलित करून, ते  भारत सरकारच्या सैनिक कल्याण निधीकडे पाठविले जात आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSNBP
Similar Posts
आदिवासी भागात शौचालये व सोलर पंपाची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात १३० शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील वाडा तालुक्यातील बावेघर, हमरापूर व केव गावात ५० शौचालयांचे
आदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चौथ्या टप्प्यांत वाडा तालुक्यातील केलटान, सापाने व कारळगाव येथे ७७ शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन १५ जून २०१९ रोजी झाले
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य पुणे : रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.
‘वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील’ पुणे : समाजातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या वृद्धांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. अनेकदा वेळेवर उपचार नसल्याने वृद्धांच्या आरोग्याची परवड होते. सातारा आणि इतर ग्रामीण भागातील वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language